डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

निवासी डॉक्टरांचा देशव्यापी संप मागे

कोलकाता इथल्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडं सोपवण्याचे आदेश काल उच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवासी डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटना फोर्डा ने देशव्यापी संप मागे घेतला आहे. सीबीआयच्या पथकानं ताली पोलीस स्थानकातून एफआयआरची प्रत ताब्यात घेतली असून चार डॉक्टरांची चौकशीही केली आहे.
मुंबईत मार्डने पुकारलेला संप आजही सुुरुच असून मुंबईतल्या केईएम, सायन आणि नायर सारख्या रुग्णालयात डॉक्टर कामावर नाहीत. आपत्कालीन सेवा मात्र सुरुच ठेवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.