पीकविम्यासंदर्भात दोषी विमा कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल – कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही

पीकविम्यासंदर्भात दोषी ठरलेल्या विमा कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि अशा कंपन्या शासनाच्या काळ्या यादीत टाकल्या जातील, असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत सांगितलं. राज्यात मार्च-एप्रिल आणि मे महिन्यात पावसामुळे नुकसान झालं असून याबाबतचे पंचनामे पूर्ण होताच शासनाच्या धोरणानुसार मदतीचं वाटप करण्यात येईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. राज्यात वीज पडून 63 जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत देण्यात येत आहे, तसंच एकंदर 75 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून सुमारे 213 कोटी रुपयांची नुकसान भरपाई अपेक्षित आहे, असं जाधव-पाटील यांनी सांगितलं. अन्नपदार्थांची घरपोच सेवा देत असलेल्या कंपन्यांच्याबाबत नागरिकांना तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक घोषित करण्यात येईल, असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानपरिषदेत सांगितलं. ई-कॉमर्स आस्थापनांच्या सखोल तपासणी दरम्यान अस्वच्छता तसंच गोदामात मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर तत्काळ कारवाई करण्यात येत आहे. या गोदामांच्या तपासण्या वाढविण्यात येत असल्याचं झिरवाळ यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.