डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 15, 2024 7:29 PM | Stree Mukti Sanghatana

printer

स्त्री मुक्ती संघटनेच्या स्थापनेला ५० वर्षं पूर्ण

स्त्रियांना समाजात समान स्थान मिळवून देण्याच्या उद्देशानं सुरू झालेली स्त्री मुक्ती संघटना ५०व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने मुंबईत आज दिवसभर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या ५० वर्षांत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात झालेले बदल आणि स्त्री चळवळीच्या वाटचालीचा स्त्रियांवर झालेला परिणाम या विषयावर या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींनी दोन सत्रांमध्ये आपापले विचार मांडले. स्त्रीवादी कार्यकर्त्या शारदा साठे, लता भिसे-सोनवणे, मनीषा गुप्ते, उर्मिला पवार, कुंदा प्र. नी., डॉ. विभूती पटेल यांनी या विषयातल्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकला. स्त्री मुक्ती संघटनेच्या अर्धशतकी वाटचालीचा मागोवा काल दृकश्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून घेण्यात आला. स्त्रीवादी चळवळीच्या रूपात सुरू झालेली ही संघटना आज कचरा व्यवस्थापन, समुपदेशन यासह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा