August 29, 2024 6:49 PM

printer

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टी सार्वकालिक उंचीवर

भारतीय शेअर बाजारात आज सेन्सेक्स आणि निफ्टीने या सत्रातला सार्वकालिक उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज ३४९ अंकाची वाढ झाली आणि तो ८२ हजार १३५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत आज १०० अंकांची वाढ झाली आणि तो २५ हजार १५२ अंकांवर बंद झाला.