January 2, 2025 7:23 PM | Stock Market

printer

देशातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी

नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी देशातल्या शेअर बाजारात आज दमदार तेजी झाली. सकाळी किरकोळ तेजीने सुरू झालेले बाजार नंतर सातत्यानं वाढत गेले. व्यवहारांच्या दरम्यान सेन्सेक्सनं ८० हजारांची पातळीही ओलांडली होती. दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ४३६ अंकांची वाढ नोंदवून ७९ हजार ९४४ अंकांवर बंद झाला. सत्रादरम्यान २४ हजार २०० च्या पलीकडे गेलेला निफ्टी दिवसअखेर ४४६ अंकांची तेजी नोंदवून २४ हजार १८९ अंकांवर स्थिरावला. डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाहन विक्रीमुळं वाहन कंपन्यांचे समभाग तेजीत होते. बँका आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांना आज जोरदार मागणी होती.