डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

December 5, 2024 7:08 PM | Stock Market

printer

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे ८१० अंकांची वाढ

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज ८१० अंकांची उसळी घेतली आणि तो  ८१ हजार  ७६६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही  २४१  अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ७०८ अंकांवर बंद झाला. तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना या तेजीचा फायदा झाला. परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यामुळे बाजारात तेजी राहिल्याचं शेअर बाजारातल्या सूत्रांनी सांगितलं.