भारतीय शेअर बाजारांमध्ये आज घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज दिवसअखेर ५९२ अंकांची घसरण झाली आणि तो ८४ हजार ४०४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १७६ अंकांची घसरण नोंदवत २५ हजार ८७७ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये नोंदणी झालेल्या ३० पैकी २३ कंपन्यांनी आज घसरण नोंदवली. यात उर्जा, तंत्रज्ञान या क्षेत्रांचा समावेश आहे. तर खनिज तेल, वायू, सिमेंट, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आज वाढ पाहायला मिळाली.
Site Admin | October 30, 2025 7:11 PM | Stock Market
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे घसरण