इस्राइल – इराण संघर्षामुळं सलग तीन दिवस घसरलेल्या देशातल्या शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या सत्रात मोठी तेजी झाली. त्यामुळं सेन्सेक्स पुन्हा ८२ हजार आणि निफ्टी २५ हजाराच्या पलीकडे जाऊन बंद झाला.
इराणसोबत चर्चेची दारं अजून खुली असून इस्राइलला पाठिंबा देण्यावर २ आठवड्यात निर्णय घेऊ असं अमेरिकन म्हटल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारांवर झाला. सेन्सेक्स दिवसअखेर १ हजार ०४६ अंकांनी वधारुन ८२ हजार ४०८ अंकांवर बंद झाला तर निफ्टी ३२० अंकांनी वधारुन २५ हजार ११२ अंकांवर स्थिरावला. बांधकाम, वित्तीय सेवा, वाहन, आरोग्य क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात वधारले.