देशातल्या शेअर बाजारांनी आज जोरदार तेजी नोंदवली आणि शुक्रवारी झालेल्या घसरणीनं झालेलं नुकसान भरुन काढलं. दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ६ अंकांनी वाढून ८० हजार २१८ अंकांवर बंद झाला. निफ्टी २८९ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ३२९ अंकांवर बंद झाला. बँका, धातू, वाहन, आरोग्य क्षेत्रातल्या समभागात मोठी वाढ झाली.
सोनं आज तोळ्यामागे ५०० रुपयांनी स्वस्त झालं आणि २४ कॅरेट सोनं ९८ हजार रुपयाला एक तोळा मिळत होतं. चांदी साडे बाराशे रुपयांनी स्वस्त झाली आणि ९९ हजार रुपयांपेक्षा महाग मिळत होती.