March 5, 2025 3:23 PM | Steve Smith

printer

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर क्रिकेट संघातला प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ यानं आज एकदिवसीय क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. कसोटी आणि टी-२० क्रिकेट प्रकारात आपण खेळणार असल्याचं स्मिथ यानं सांगितलं. 

 

क्रिकेटमधली वाटचालीत अनेक समाधान आणि आनंद देणाऱ्या आठवणी आहेत. दोन विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होणं अभिमानास्पद क्षण असल्याचं स्मिथनं म्हटलं आहे. स्मिथनं १७० एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करत  ५ हजार ८०० धावा केल्या आहेत. यामध्ये १२ शतकं आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय प्रकारात स्मिथच्या नावावर २८ बळींची नोंद आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.