स्टील उत्पादन २०३० पर्यंत ३० कोटी टन तर २०४७ पर्यंत ५० कोटी टन करण्याचं भारताचं उद्दिष्ट

भारताचं स्टील उत्पादन २०३० पर्यंत ३० कोटी टन तसंच २०४७ पर्यंत ५० कोटी टन करण्याचं उद्दिष्ट असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सीआयआय स्टील शिखर परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात स्टील मंत्रालयाचे सचिव संदीप पुंडरीक यांनी ही माहिती दिली. गेल्या दशकभरात भारताचं स्टील उत्पादन दुपटीने वाढलं आहे, पायाभूत सुविधा आणि देशांतर्गत मागणीही वाढली आहे, असं त्यांनी सांगितलं.  चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत स्टील उद्योग क्षेत्रानं साडेआठ टक्के वाढ नोंदवल्याचंही त्यांनी नमूद केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.