माजी राज्यपाल रा. सु. गवई यांच्या स्मारकाचं लोकार्पण आज अमरावती इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. गवई यांनी विविध पदावर काम केलं, त्यांची संसदीय कारकीर्द उत्तुंग आहे. पक्षीय सीमा ओलांडून त्यांनी सर्वांसोबत संबंध ठेवले, त्यामुळे देशभरातील लोक त्यांच्याशी जोडले गेले असं मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाला भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई, तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित होते.
Site Admin | October 30, 2025 6:56 PM
माजी राज्यपाल रा. सु. गवई यांच्या स्मारकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण