डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पुढील काळात राज्यावर आर्थिक संकट ओढवू शकतं – सु्प्रिया सुळे

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या वाईट स्थितीत असून पुढील काळात राज्यावर आर्थिक संकट ओढवू शकतं असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होत्या. 

 

राज्य सरकार कर्जाच्या ओझ्याखाली असूनही कोट्यवधींच्या जाहिरातींसाठी करदात्याच्या पैशांची उधळपट्टी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल अर्थतज्ञ  तसंच भारतीय जनता पक्षासह  मित्रपक्षांचे  नेते चिंता व्यक्त करत आहेत, आणि असंच सुरू राहिल्यास राज्य सरकारला कर्मचाऱ्यांचा पगार देणंही अवघड होऊ शकतं, असं त्या म्हणाल्या.