डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या तीर्थदर्शन योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापुरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत या योजनेतील पहिल्या कोल्हापूर ते अयोध्या या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रत्यक्ष उपस्थित होते. या पहिल्या रेल्वेगाडीतून ८०० ज्येष्ठ नागरिक रवाना झाले असून आपली वडीलधारी मंडळी ही आपली जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या योजनेच्या माध्यमातून ६० वर्षावरील सर्व धर्मीय ज्येष्ठांना विविध ठिकाणी तीर्थयात्रा घडवण्यात येणार आहे.