डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

लाडकी बहीण योजनेच्या निधी हस्तांतरणाला पुण्यात औपचारिक प्रारंभ

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम आज पुण्यात बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, तसंच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्यातील 15 हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधिक स्वरुपात या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येत असून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3 हजार रुपये लाभार्थी भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास 14 ऑगस्टपासूनच सुरूवात झाली आहे. काल अखेर पुणे जिल्ह्यातील 5 लाखाहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली आहे.