July 28, 2025 6:53 PM

printer

राज्य सरकार अ‍ॅप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई बाईक सेवा सुरू करणार

राज्यात अ‍ॅप आधारित रिक्षा, टॅक्सी आणि ई बाईक सेवा राज्य सरकार सुरू करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं. या अ‍ॅपला जय महाराष्ट्र, महा राईड, महा यात्री किंवा महा गो यापैकी एक नाव दिलं जाईल, असं ते म्हणाले.

 

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर हे अ‍ॅप कार्यान्वित केलं जाईल. यंत्रणेत पारदर्शकता ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश यात असून लवकरच अ‍ॅप तयार होणार आहे. यामुळे राज्यातल्या लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असं प्रताप  सरनाईक म्हणाले. 

 

या माध्यमातून मराठी तरुण- तरुणींना विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी मुंबै बँक वाहन खरेदीसाठी १० टक्के व्याजदराने कर्ज देईल, अशी ग्वाही मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली.