डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

गडचिरोलीला महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील

गडचिरोलीचा उल्लेख महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्यसरकार प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं रुबी हॉस्पीटल अँड वेलनेस रुग्णालय आणि महाविद्यालय संकुलाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण आरोग्याचा अधिकार असून गडचिरोली सारख्या भागात देखील आरोग्यसेवा पोहोचत आहेत, जिल्ह्याचं चित्र बदलत आहे, असं ते म्हणाले.

 

राज्य सरकारनं नुकतीच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवली आहे, गडचिरोली जिल्ह्यासाठी राज्य सरकारनं पाचशे कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीनं पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत.

 

गडचिरोली हा जिल्हा देशाचं स्टील हब आहे. इथं पाच कोटी झाडं लावून वृक्ष आच्छादन वाढवायचं आहे, जल, जमीन आणि संवर्धन करुन विकास साधण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.