डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ले रोखण्यासाठी राज्य सहकारी बँकेकडून सायबर सुरक्षा केंद्र स्थापन

वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ल्यांचं वाढलेलं प्रमाण पाहता राज्य सहकारी बँकेने सायबर सेक्युरिटी ऑपरेशन सेंटरची उभारणी केली आहे. वाशी इथं उभारण्यात आलेल्या या केंद्राचं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांनी ही माहिती दिली. सहकार सुरक्षा या नावाने हे केंद्र कार्यरत होणार असून, राज्यातल्या सहकारी बँका आणि पतसंस्थांना कोणताही मोबदला न घेता ही सुरक्षा सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा