डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी सकारात्मक निर्णय घेऊ, परिवहन मंत्र्यांचं आश्वासन

एसटी कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं.  वेतनवाढ, महागाई भत्ता आदी मागण्यांसाठी एसटी कामगार संघटना दिवाळीपूर्वी आंदोलन करणार होत्या, त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात एसटी कामगार संघटनांसोबत बैठक झाली, त्यावेळी सरनाईक बोलत होते. कामगारांचे महागाई भत्ते, घरभाडे भत्ता आणि अन्य थकीत भत्ते, तसेच दिवाळी सण अग्रिम देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असं आश्वासन सरनाईक यांनी दिलं. महामंडळाला आर्थिकदृष्ट्या विकसित करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

 

ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा आणि ई-बाईक सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी प्रवासी आणि चालकांना केंद्रस्थानी ठेवावं, भरमसाठ नफा कमवण्यासाठी आर्थिक लूट करू नये असं आवाहन सरनाईक यांनी यावेळी केलं. ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा आणि ई-बाईक टॅक्सीसाठी ॲग्रिगेटर धोरण नियमावली येत्या दोन दिवसांत जाहीर होणार असून त्यात प्रवासी आणि चालकांच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, असं सरनाईक म्हणाले.