डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 15, 2025 3:21 PM | Best Bus

printer

एसटी महामंडळाची उद्यापासून एसटी पास थेट तुमच्या शाळेत मोहीम सुरू

एसटी  बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून एसटी महामंडळ “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही विशेष मोहीम राबवणार आहे. या मोहिमेतून विद्यार्थ्यांना एसटीचे पास त्यांच्या शिक्षणसंस्थांमधून वितरीत केले जाणार आहेत.  परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तसे निर्देश  दिले आहेत.  शासनाकडून विद्यार्थ्यांना  मिळणारी सवलत तसंच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत विद्यार्थीनींना दिले जाणारे मोफत प्रवासाचे पास त्यांना एसटी आगारातून घ्यावे लागत होते.  परंतु आता शिक्षण संस्थानी दिलेल्या माहितीप्रमाणे हे पास आता एसटी महामंडळाकडून थेट संस्थांकडे येतील आणि विद्यार्थ्यांना आपापल्या संस्थांमधून ते घेता येतील. त्यासाठी सर्व शाळा महाविद्यालयांनी आपल्या संस्थेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवावी अशी सूचना  एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी शिक्षणसंस्थांना केली आहे.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.