ST कडून शालेय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइनची घोषणा!

शालेय विद्यार्थी – विद्यार्थिनींना एसटी बस संदर्भात काही माहिती हवी असेल किंवा काही  समस्या असेल तर एसटीनं त्यांच्यासाठी  हेल्पलाईन सुरू केली आहे. १८००- २२१- २५१ या क्रमांकावर संपर्क साधला तर त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. 

 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जावी, तसंच शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्याची लेखी तक्रार आल्यास जितक्या दिवसाचं  शालेय नुकसान होईल, तितके दिवस यास जबाबदार असणाऱ्या अधिकार्‍यांना निलंबित अथवा सक्तीच्या  रजेवर पाठवण्यात यावं,  असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.