एसटी महामंडळाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट !

एसटी महामंडळाच्या ८५,००० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६,००० रुपये सानुग्रह अनुदान तसंच सणाची उचल म्हणून १२,५०० रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. एसटी कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक मुंबईत आज झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. साडे सहा हजार पगारवाढीची थकित रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ६५ कोटी रुपये खर्च येणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.