April 11, 2025 8:45 PM | ST employees

printer

ST कर्मचाऱ्यांच्या पगाराची तारीख निश्चित, ‘या’ दिवशी होणार पगार !

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल, ही अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी असेल, अशी ग्वाही परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आज महामंडळाच्या मुख्यालयात अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात फक्त ५६ टक्के वेतन देता आलं, हे अत्यंत दुर्दैवी असून उर्वरित वेतनासाठी आपण अर्थखात्यांच्या सचिवांची भेट घेतल्याचंही सरनाईक यांनी यावेळी सांगितलं. विविध सवलतीपोटी शासनाकडे महामंडळाचे थकीत असलेले १ हजार ७६ कोटी रुपये तातडीने द्यावेत अशी आग्रही मागणी सरनाईक यांनी यावेळी केली. सध्या ३ हजार नवीन बसेसची निविदा प्रक्रिया सुरू असून भविष्यात ग्रामीण आणि दुर्गम भागात उपयुक्त ठरेल अशा मिडी बसेस घेण्यात येणार आहेत, असंही सरनाईक म्हणाले.