डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी !

गणपती उत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता एसटी महामंडळानं यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४ हजार ३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांमधल्या प्रमुख बसस्थानकांमधून या जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. या गाड्या आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्यांचं आरक्षण बसस्थानकावर, किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे.

 

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी बसस्थानक आणि बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. कोकणातल्या महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकं तैनात केली जाणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृहं उभारली जाणार आहेत.