डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार नाही

एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार नसल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज धाराशिव इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. महायुती सत्तेवर आल्यापासून २ हजार ६१० खासगी गाड्या रद्द केल्या आहेत. आगामी तीन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ३  हजार नवीन बसगाड्या खरेदी केल्या जातील, तर पुढच्या पाच वर्षांत पाच हजार बसगाड्या घेणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. 

 

धाराशिव आणि तुळजापूर बस स्थानकातली कामं अपूर्ण असतानाही उद्घाटन करायला लावणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जात असून दोषींवर कारवाई करणार असल्याचं ते म्हणाले.