डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 28, 2025 3:47 PM | Maharashtra | ST Bus

printer

राज्यात एसटी भाडेवाढ विरोधात आंदोलन

एसटी भाडेवाढ विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन झालं. 

सिंधुदुर्गमधल्या कुडाळ बसस्थानकात आज सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. निवडणुकीपूर्वी एसटीची दरवाढ केली नव्हती पण आता निवडणूक झाल्याबरोबर महायुती सरकारने एसटीची  दरवाढ केली.  ही  दरवाढ रद्द झाली नाही, तर यापेक्षा मोठे आंदोलन उभारू, असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी चौकातल्या  एस टी स्टॅन्ड इथं आणि  धुळे बस स्थानकातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं  चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.