January 27, 2025 6:58 PM

printer

एस.टी भाडेवाढ रद्द करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

एस.टी.ची भाडेवाढ रद्द करण्याची मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं. 

हिंगोली जिल्ह्यात हिंगोली शहर, कळमनुरी, औंढा नागनाथ इथं  झालेल्या आंदोलनामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातली वाहतूक ठप्प होती. 

नांदेडमध्ये कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकात आंदोलन करत एस.टी. बस अडवून ठेवल्या आणि घोषणाबाजी केली. सामान्य प्रवाशांना न परवडणारी भाडेवाढ त्वरित मागे घ्यावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा  इशारा आंदोलकांनी दिला

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.