डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 7, 2025 3:15 PM | ST Bus

printer

एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना राबवणं आवश्यक

एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी तसंच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी धुळे विभागाने राबवलेल्या उपाययोजना सगळीकडे राबवणं आवश्यक आहे, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

 

कमी गर्दी असणाऱ्या दिवशी आणि साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी अत्यल्प प्रतिसाद असलेल्या फेऱ्यांचं पुनरावलोकन करून त्या चांगलं उत्पन्न मिळणाऱ्या मार्गावर वळवणं, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुनिश्चित करणं, अवैध वाहतूक रोखून तिथं बसगाडीच्या अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आदी उपाययोजना सुचवण्यात अधिकाऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी सुचवल्या.