डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

छत्रपती संभाजी महाराजांवरचा आक्षेपार्ह मजकूर न काढल्याने ४ संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल

छत्रपती संभाजी महाराजांवरचा आक्षेपार्ह मजकूर न काढल्याबद्दल महाराष्ट्र सायबर विभागाने विकिपीडियाच्या चार संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

विकिपीडियाचं संपादन करणाऱ्या  कॅलिफोर्निया इथल्या विकिमीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवून मजकूर काढून टाकण्याची विनंती करण्यात आली होती.

 

नोटीस पाठवूनही हा मजकूर हटवण्यात आलेला नाही. अशा प्रकारचा मजकूर माहितीच्या स्रोतावर झळकत राहिला तर राज्यात तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सायबर विभागाने दिली आहे.