श्रीलंकेच्या बदुल्ला जिल्ह्यात दरडी कोसळल्यामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण बेपत्ता असल्याचं वृत्त आहे. बदुल्ला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सहा ठिकाणी दरडी कोसळल्या असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या राष्ट्रीय बांधकाम संशोधन संस्थेने बदुल्ला, कॅण्डी, मटाले आणि नुवारा एलीया या जिल्ह्यांमधल्या दरड प्रवण जागा नागरिकांनी रिकाम्या कराव्यात, असा इशारा दिला आहे.
Site Admin | November 27, 2025 1:33 PM | SriLanka Landslides
SriLanka : बदुल्ला जिल्ह्यात दरडी कोसळल्यामुळे ११ जणांचा मृत्यू