श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळातल्या बळींची संख्या आता ४७९ झाली आहे. वादळामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये साडेतीनशे लोक अद्याप बेपत्ता आहेत. अद्यापही श्रीलंकेतल्या काही दुर्गम भागातून पूर, दरडी कोसळण्याच्या त्याचप्रमाणे भूस्खलन आणि इमारती कोसळण्याच्या बातम्या येत आहेत. श्रीलंकेतल्या अनेक भागातला संपर्क अद्याप तुटलेलाच असून काही भाग मदतीपासून वंचित आहेत.
दरम्यान, भारतानं ऑपरेशन सागर बंधूच्या माध्यमातून आवश्यक ती मदत सुरु ठेवली आहे. भारतीय वैद्यकीय पथक आणि तात्पुरत्या रुग्णालयांची उभारणी करणारी आवश्यक ती यंत्रसामुग्री काल कोलंबोत पोहोचली आहे. भारतीय सैन्यदल आणि एनडीआरएफचं पथक श्रीलंकेच्या या आपत्तीच्या वेळी मानवी दृष्टीकोनातून मदत पुरवत आहे.