श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके आज भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. दिसानायके यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्य अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. या भेटीदरम्यान दिसानायके राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असून द्विपक्षीय मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत. गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि दोन्ही राष्ट्रांमधील व्यावसायिक संबंध वाढवण्यासाठी दिसानायके दिल्लीतील एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर ते भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामायिक सांस्कृतिक घटकांच्या अनुषंगाने बोधगया इथं भेट देणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.