मल्याळी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक श्रीनिवासन यांचं आज सकाळी कोची इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. १९७६ साली ‘मणीमुझक्कम’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या श्रीनिवासन यांनी मोहनलाल आणि ममूठी सारख्या अभिनेत्यां सोबत अनेक चित्रपटांत सहकलाकाराच्या भूमिका निभावल्या. श्रीनिवासन यांनी २२५ हुन अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला असून १९९८ मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘चिंथाविष्टयाया श्यामला’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
Site Admin | December 20, 2025 3:38 PM | Sreenivasan
ज्येष्ठ अभिनेते श्रीनिवासन यांचं निधन