चेन्नईमध्ये सुरु असलेल्या स्क्वॉश विश्वचषक २०२५ स्पर्धेच्या गट ब सामन्यात, भारतानं ब्राझीलवर ४-० असा दमदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वेलावन सेंथिलकुमारनं पेड्रो मोमेट्टोवर ३-० नं मात करत विजयामध्ये योगदान दिलं. भारतानं यापूर्वी आपल्या पहिल्या सामन्यात स्वित्झर्लंडला ४-० असं हरवलं होतं.
स्क्वाश विश्वचषक २०२५ या स्पर्धेत चार गटांमध्ये १२ संघ खेळत असून, प्रत्येक गटातले अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. भारताचा पुढला सामना दक्षिण आफ्रिके बरोबर होईल.