भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंहनं ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या एनएसडब्ल्यू बेगा खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत तिनं इजिप्तच्या स्क्वॅशपटू नूर हिचा ५४ मिनिटात ३-२ नं पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना इजिप्तच्या हबीबा हिच्याशी होईल. हबीबानं उपांत्य फेरीत आकांक्षा साळुंखे हिचा ३-१ नं पराभव केला.
Site Admin | August 16, 2025 7:53 PM
स्क्वॅशपटू अनाहत सिंहनं एनएसडब्ल्यू बेगा खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश