August 22, 2025 8:43 PM

printer

१६ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या एलावेनील वालारिवनला सुर्वणपदक

कझाकस्तानमधे सुरु असलेल्या१६ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या एलावेनील वालारिवननं सुर्वणपदक पटकावलं. अंतिम फेरीत तिनं २५३ पूर्णांक ६ दशांश गुण मिळवले. हा नवा राष्ट्रीय विक्रम आहे. चीनच्या पेंग शिनलूनं रौप्य, तर दक्षिण कोरियाच्या क्वॉन युन जी हिनं कांस्यपदक पटकावलं.