मुकबधिरांच्या ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजीत अभिनव देश्वाल आणि प्रांजली धुमाळ या जोडीला सुवर्णपदक

जपानमध्ये टोकिओ इथं सुरू असलेल्या मूकबधीरांच्या 25 व्या ऑलिंपिक स्पर्धेत अभिनव देश्वाल आणि प्रांजली धुमाळ या भारतीय नेमबाज जोडीनं 10 मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं.

 

अंतिम लढतीत त्यांनी चिनी तैपाईच्या जोडीला 16-6 असं पराभूत केलं. तर, कुशाग्र सिंग राजावतनं 50 मीटर रायफल प्रोन स्पर्धेत कास्य पदक पटकावलं. या स्पर्धेत नेमबाजीत भारतानं आतापर्यंत एकूण 11 पदकांची कमाई केली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.