डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 17, 2025 9:37 AM | SPORTS

printer

आशियाई स्क्वॉश कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाला कास्यपदक

हाँगकाँग स्क्वॉश सेंटरमध्ये पार पडलेल्या आशियाई कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी कास्यपदकं मिळवली आहेत. भारतीय पुरुष संघाला उपांत्य फेरीत मलेशियाकडून पराभव पत्करावा लागला, तर अनहत सिंगच्या नेतृत्वाखालील महिला संघाला यजमान हाँगकाँगकडून पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला आशियाई कनिष्ठ सांघिक स्क्वॉश विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कांस्यपदक देण्यात येतं.

 

1983 मध्ये सर्वप्रथम झालेल्या आशियाई कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेची ही 22 वी आवृत्ती होती. 2011 आणि 2017 मध्ये विजेते ठरलेल्या भारतीय पुरुष संघानं आता 2 सुवर्ण, 6 रौप्य, 11 कांस्य अशी एकूण 19 पदकं जिंकली आहेत. दरम्यान २००३ आणि २०१३ मध्ये विजेत्या भारतीय महिलांनी स्पर्धेच्या इतिहासात दोन सुवर्ण, दोन रौप्य, आठ कांस्य अशी एकंदर १२ पदकं जिंकली आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.