February 10, 2025 3:39 PM

printer

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची १२० पदकांची कमाई

उत्तराखंड इथं सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आत्तापर्यंत १२० पदकांची कमाई केली आहे. यात २९ सुवर्ण, ४३ रौप्य आणि ४८ कांस्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी कायम आहे.

 

४२ सुवर्णपदकांसह सेना दलाचा संघ पहिल्या, तर ३१ सुवर्णपदकं पटकावून कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर टिकून आहे. २३ सुवर्णपदकांसह हरियाणा चौथ्या, तर २० सुवर्णपदकं जिंकून मध्य प्रदेश पाचव्या स्थानावर आहे. १५ सुवर्णपदकांसह यजमान उत्तराखंडचा संघ सातव्या स्थानावर आहे.