डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान घेतलेल्या ७ हजार १५९ आरोग्य शिबिरांतून ३ लाख २६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी ९ हजार ९६० रुग्णांना पुढील उपचारासाठी तज्ज्ञांकडे पाठवण्यात आलं. या रुग्णांना पुढील उपचारही मोफत पुरवले जाणार असल्याचं मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, यांनी सांगितलं आहे.