September 30, 2025 9:12 PM

printer

स्पीड पोस्टचे नवे दर लागू, ओटीपी आधारित सेवाही सुरू होणार

भारतीय टपाल विभागाने आपल्या स्पीड पोस्ट या सेवेसाठी नव्या दरांची घोषणा केली आहे. हे दर उद्यापासून लागू होतील. या नव्या दरांनुसार, ५० ग्रॅम वजनाच्या पोस्ट अथवा पार्सलवर स्थानिक पातळीवर १९ रुपये, २०० किलोमीटर ते २ हजार किलोमीटर अंतरासाठी ४७ रुपये आकारले जातील. ५१ ते अडीचशे ग्रॅम वजनाच्या पार्सलसाठी शहरातल्या शहरात केलेल्या डिलिव्हरीसाठी २४ रुपये तर अडीचशे ते पाचशे ग्रॅम वजनाच्या पार्सलसाठीचे दर २८ रुपयांपासून सुरू होतील. स्पीड पोस्ट सेवा अधिकाधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ऑनलाईन पेमेंट आणि बुकिंग सेवा, ओटीपी आधारित डिलिव्हरी सेवा अशा आधुनिक सुविधांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना स्पीडपोस्टच्या दरांवर १० टक्के सूट देण्यात आली असून नवीन ग्राहकांसाठी ५ टक्के सूट देण्यात आली आहे.