डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन  रेल्वेनं येत्या २२ ते २७ ऑगस्ट दरम्यान जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून रत्नागिरी, सावंतवाडी आणि मडगावपर्यंत तसंच पुणे स्थानकापासून रत्नागिरीपर्यंत गाड्या प्रवास करतील. दिवा ते चिपळूण पूर्णपणे अनारक्षित गाडी २३ ऑगस्टला धावेल. 

 

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल पासून ठोकुर आणि सावंतवाडीपर्यंत वांद्रे ते रत्नागिरी, बडोदा तसंच विश्वामित्री ते रत्नागिरी अशा विशेष गाड्या धावतील.  पश्चिम रेल्वेच्या  गाड्यांचं  आरक्षण येत्या २३  जुलै पासून उपलब्ध  होणार असल्याची माहिती रेल्वेनं एक्स प्रसार माध्यमातून दिली आहे.