डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाची मतदार याद्यांची विशेष सारांश उजळणी जाहीर

महाराष्ट्रात, आगामी राज्य विधानसभा निवडणुकांच्या आधी, निवडणूक आयोगानं मतदार याद्यांची विशेष सारांश उजळणी जाहीर केली आहे. याअंतर्गत, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रं स्थापन करण्यावर निवडणूक आयोगाचा भर राहील. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांना बूथ-स्तरीय स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्यात येईल. या स्वयंसेवकांना पात्र मतदारांची नावे अद्ययावत करण्याचे आणि सोसायटी सोडून गेलेल्या किंवा सोसायटीतील मृत व्यक्तींची नावे काढून टाकण्याचे काम दिले जाईल. गृहनिर्माम सोसायटीमध्ये बूथ स्थापन करण्यासाठी, सोसायटीने जवळच्या बूथ स्तरीय अधिकाऱ्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे.सोसायटी Google फॉर्मद्वारे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज देखील सादर करू शकते. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण सोसायट्यांना मतदारांसाठी सोयीस्कर आणि जवळच्या ठिकाणी मतदान केंद्र स्थापन करण्यासाठी पावलं उचलण्याचं आवाहन केलं आहे.