देशातली ७ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापनादिनानिमित्त विशेष कार्यक्रम

देशातली ७ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेश आज आपला स्थापना दिवस साजरा करत आहेत. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, आणि पंजाब ही राज्य तसंच लक्षद्वीप, आणि पुदुच्चेरी हे केंद्रशासित प्रदेश १ नोव्हेंबर रोजी स्थापन झाले. राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिथल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व राज्यांनी देशाच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान दिलं असून, राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विकास यात्रेत सातत्यानं नवे विक्रम प्रस्थापित व्हावेत, अशी इच्छा राष्ट्रपतींनी व्यक्त केली आह

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हरयाणा मधल्या शेतकरी बंधुभगिनींनी आपल्या अविरत परिश्रमांमधून आणि शूर सैनिकांनी आपल्या राष्ट्रभक्तीतून देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. केरळचं निसर्ग सौंदर्य आणि वारसा भारताच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक आहे, कर्नाटक हे राज्य ज्ञानात रुजलेल्या प्रगतीचं प्रतीक असून या राज्यानं नेहमीच कला, साहित्य, संगीत आणि उद्योगप्रधान संस्कृती जोपासली आहे, तर देशाच्या हृदयात वसलेलं मध्यप्रदेश हे राज्य प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला आहे.

या सर्व ठिकाणी राज्यस्थापनेचे कार्यक्रम होत आहेत.