डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

गणेशविसर्जनानंतर विविध चौपाट्या, समुद्रकिनाऱ्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम

गणेशविसर्जनानंतर विविध चौपाट्या, समुद्रकिनाऱ्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेद्वारे दोन दिवसांत ३६३ मेट्रिक टन घन कचरा संकलित करण्यात आला. तसंच, सार्वजनिक आणि कृत्रिम विसर्जनस्थळांवरचं निर्माल्य गोळा करण्यासाठी यंदा महानगरपालिकेनं ५०० निर्माल्य कलश आणि ३५०पेक्षा जास्त वाहनं उपलब्ध करून दिली होती. त्यातून सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्य संकलित झालं असल्याची माहिती महानगरपालिकेनं दिली आहे. हे निर्माल्य ३७ सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्पांमध्ये पाठवण्यात आलं असून येत्या महिन्याभरात त्याचं सेंद्रीय खत तयार होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.