देशाला समृद्ध आणि विकसित बनवण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

देशाला समृद्ध आणि विकसित बनवण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं असल्याचं प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं. नवी दिल्ली इथं राष्ट्रकुल देशातल्या लोकप्रतिनिधी गृहांच्या पदाधिकाऱ्यांची १० वी परिषद सुरू आहे. यात शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासा संदर्भात विधानमंडळाची भूमिकाया विषयावर आपलं मत मांडताना नार्वेकर बोलत होते. महाराष्ट्र हे वेगानं नागरीकरण होणारं राज्य असल्याचं नार्वेकर म्हणाले. राज्यात सार्वजनिक वाहतुकीचं विस्तारित जाळं, इलेक्ट्रिक वाहनं, गृहनिर्माण प्रकल्प उभारले जात असल्याचंही नार्वेकर यांनी सांगितलं. शहरांबरोबरच ग्रामीण भागात रोजगाराची संधी निर्माण करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.