डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 13, 2025 10:17 AM | SpaceX

printer

अवकाशस्थानकाकडे जाण्यासाठीचं उड्डाण लांबणीवर

आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाकडे जाण्यासाठीचं उड्डाण स्पेसएक्सनं शेवटच्या क्षणी लांबणीवर टाकलं आहे. भारताची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अमेरिकेचे अंतराळवीर बुच विलमोर या अवकाशस्थानकात अडकून पडले आहेत. त्यांच्या जागी इतर चार अंतराळवीर पाठवण्याची स्पेसएक्सची मोहीम आहे. सुनीता विल्यम्स आणि विलमोर गेले नऊ महिने या अवकाशस्थानकात अडकून पडले आहेत. पुढचं उड्डाण कधी होणार हे स्पेसएक्सनं अजून स्पष्ट केलेलं नाही. दरम्यान, दोन्ही अंतराळवीर सुरक्षित असल्याचं नासानं स्फष्ट केलं आहे.