डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नैर्ऋत्य मोसमी पावसाचं येत्या २७ मे रोजी केरळमधे आगमन होईल- हवामान विभाग

नैर्ऋत्य मोसमी पावसाचं आगमन येत्या २७ मे रोजी केरळात होईल, असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. यात ४-५ दिवसांचा फरक पडू शकतो.

 

१३ मे च्या आसपास नैर्ऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरात आणि अंदमान बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाचे प्रवक्ते उमाशंकर दास यांनी सांगितलं. दरवर्षी मोसमी पाऊस साधारणपणे १ जून रोजी केरळात दाखल होतो.