संपूर्ण देशातून नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास आज पूर्ण झाला. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक आणि केरळ-माहे या भागांत ईशान्य मान्सून पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. या प्रदेशात उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसंच पुढील सात दिवसांत या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Site Admin | October 16, 2025 8:36 PM | Southwest monsoon
नैऋत्य मौसमी पावसाची संपूर्ण देशभरातून माघार