दक्षिण मुंबईच्या कफ परेड भागातल्या एका चाळीला आज लागलेल्या आगीत एका १५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवलं. तर, वरळीच्या महाकाली नगरमध्ये काल रात्री लागलेल्या आगीचा फटका ७ ते ८ झोपड्यांना बसला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Site Admin | October 20, 2025 1:30 PM | Cuffe Parade chawl fire | South Mumbai
दक्षिण मुंबईच्या कफ परेडमध्ये चाळीला लागलेल्या आगीत १५ वर्षीय युवकाचा मृत्यू
